इंदौर: देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदौर येथे गुरुवारी उघड्यावर लघुशंका केल्यामुळे एका व्यक्तीला अनोखी शिक्षा मिळाली. तीस वर्षीय व्यक्तीला रस्त्यावर 5 तास कचरा उचलण्याची शिक्षा देण्यात आली. त्याला 100 रुपये दंड थोटावण्यात आला होता मात्र त्याच्याकडे तेवढी रक्कम नसल्यामुळे त्याला कचरा साफ करण्याचे काम देण्यात आले.
इंदौर महानगरपालिका (आयएमसी) चे आरोग्य अधिकारी विवेक गंगराडे यांच्या माहितीनुसार, नागरी संस्थेची टीम गुरुवारी सकाळी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पोगलग्राउंड इंडस्ट्रियल एरियामध्ये पोहोचली. दरम्यान, 30 वर्षांचा माणूस उघड्यावर लघुशंका करताना पकडला गेला.
ते म्हणाले की, रोजंदारीवर मजुरी करणाऱ्या या व्यक्तीस 100 रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि ते म्हणाले की तो इंदौरच्या बाहेरील ठिकाणाहून आला आहे होता.
गंगराडे यांनी सांगितले की, सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत या व्यक्तीला आयएमसीच्या गाडीत पाठवले होते. जी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा गोळा करते. कचरा संकलनाच्या कामात त्यांनी आयएमसी कर्मचाऱ्यांना पाच तास सेवा देऊन शहरातील स्वच्छतेत मदत केली.
विशेष म्हणजे इंदौरने सलग तीन वर्षे राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळवले आहे.
स्वच्छ शहर, सुंदर भारत अभियान – इंदौर पुन्हा नंबर वन, महाराष्ट्रातील ‘हे’ शहर सातव्या स्थानी