लखनौ : वेस्टइंडिज-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात गोलंदाजांच्या अचूक व प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर विंडीजने अफगाणिस्तानवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्या व दुस-या डावात एकूण १० गडी बाद करणारा रहकेम काॅर्नवाल सामन्याचा मानकारी ठरला.
Victory by 9 wickets as West Indies secure win over Afghanistan before lunch on Day 3 of the Test Match
Rahkeem Cornwall is Man-of-the-Match with 10 wickets and three catches.
🇦🇫v🌴. #AFGvWI
Live Scorecard ⬇️https://t.co/BUwjGoxgGr pic.twitter.com/cJrWVtL3n4— Windies Cricket (@windiescricket) November 29, 2019
तिस-या दिवशी कालच्या ७ बाद १०९ धावसंख्येवरून पुढे खेळताना अफगाणिस्तानचा दुसरा डाव १२० धावांवर संपुष्टात आला. आज खेळ सुरू झाला तेव्हा राशिद खान ०१, यामिन अहमदजाई ०१ आणि अफसर जजई ०७ धावा काढत एका पाठोपाठ झटपट माघारी परतले. दुस-या डावात जेसन होल्डर, राॅसटन चेज आणि रहकेम काॅर्नवाल यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. अफगाणिस्तानने दुस-या डावात ३० धावांची आघाडी घेतली होती.
TOP RANKING!
Brilliant job by West Indies this morning with the lights on! Afghanistan all out for 120 in 2nd innings — 31 runs to win the Test match.
Chase 3-10
Holder 3-20
Cornwall 3-46🇦🇫v🌴. #AFGvWI
Live Scorecard ⬇️https://t.co/BUwjGoxgGr pic.twitter.com/RBxS3wTBrO— Windies Cricket (@windiescricket) November 29, 2019
विजयासाठीचे ३१ धावांचे लक्ष्य विंडीजने ६.२ षटकांत १ बाद ३३ धावा करत पूर्ण केले. वेस्टइंडिजकडून दुस-या डावात फलंदाजीत क्रैग ब्राथवेटने ०८ तर जाॅन कैंपबेलने नाबाद १९ आणि शाइ होपने नाबाद नाबाद ०६ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत आमिर हमजाने १ गडी बाद केला.
अफगाणिस्तानने पहिल्या डावात १८७ धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना विंडिजने शमर ब्रूक्सच्या शतकी (१११) आणि जाॅन कैंपबेलच्या (५५) खेळीच्या जोरावर पहिल्या डावात २७७ धावांपर्यत मजल मारत ९० धावांची आघाडी घेतली होती.
संक्षिप्त धावफलक :
अफगाणिस्तान पहिला डाव – सर्वबाद १८७.
वेस्टइंडिज पहिला डाव – सर्वबाद २७७.
अफगाणिस्तान दूसरा डाव – सर्वबाद १२०.
वेस्टइंडिज दूसरा डाव : १ बाद ३३.