मुंबई – राजकुमार रावने बॉलिवूडमध्ये टॉपच्या कलाकारांबरोबर काम करून स्वतःची योग्यता सिद्ध केली आहे. त्याने स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी नेहमीच हटके रोल निवडला आहे.’स्त्री’मध्ये त्याच्या रोलला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती.
यातच पुन्हा एकदा असाच हटके विषय घेऊन राजकुमार राव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘मेल सरोगसी’वर चित्रपट तयार करण्यात येणार असल्याचे समजते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत राजकुमार राव दिसणार असल्याची चर्चा आहे.
View this post on Instagram
For @filmfareme @karrtikd Styled by @anaitashroffadajania @style.cell Pictures: pause_world
दरम्यान, राजकुमार राव हा सध्या बॉलिवूडमधला एक तगडा अभिनेता म्हणून ओळखला जातो. न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री, जजमेंटल है क्या, अलिगढ, सिटीलाईट असे कमी बजेटचे सुपरहिट सिनेमे त्याच्या नावावर आहेत.