मोतीबागेचं ऑस्करला स्थलांतर…

नवी दिल्ली :- चिटपाखरू नसणाऱ्या गाव. धुळखात पडलेली घरे… दरवाजांना प्लास्टीक पिशच्यात गुंडाळून लावलेली कुलपे… यावरून कॅमेरा फिरत असतो… पार्श्‍वभूमी असते पौरी घरवालच्या डोंगराळ निसर्गाची… हे भयाण चित्रण पाच एकर शेतीचा तुकडा असणाऱ्या “मोती बागे’पर्यंत येतो. तेथे ही भयावह शांतता भंग पावते आणि आवाज येतो विद्यादत्त शर्मा यांचा.

विद्यादत्त शर्मा (वय 83) हे त्यांचा भाचा निर्मल चंदर यांनी निर्माण केलेल्या मोती बाग या डॉक्‍युमेंटरीचे नायक. त्यांचंच स्वगत आणि कनितांतून ही डॉक्‍यमेंटरी पुढे वेग घेते. या डॉक्‍युमेंटरीने केरळातील आंतरराष्ट्रीय माहितीपट महोत्सव आणि दिल्लीतील ओपन फेम महोत्सवात विजेतेपट पटकावले. आता तर या माहितीपटाला थेट ऑस्करचे तिकीट मिळाले आहे.

दिग्दर्शक निर्मल चंदर

मोती बाग ही खरं तर वैयक्तीक गोष्ट  पण समाजावर भाष्य करणारी. उत्तराखंडमधील अत्यंत ग्रामीण भागतील समस्यांवर प्रकाशझोत टाकणारी. सामुहिक स्थलांतर हा या माहितीपटाचा केंद्रबिंदू. शर्मा यांनी अनुभवलेले… पाहीलेले हे पलायन 1960च्या दशकातील. उत्तर प्रदेशमधील सर्व्हे ऑफिसरची कटकटीची नोकरी सोडून शर्मा, गड्या आपुला गाव बरा म्हणत गावात शेती करण्यासाठी परतण्याचा निर्णय घेतला. जवळपास 50 वर्षात त्यांनी पत्नी आणि मोठ्या मुलाचा मृत्यू पचवला. चांगल्या आयुष्याची स्वप्न पहात शेजार पाजाऱ्यांनी केलेलं स्थलांतर पाहिलं. त्यांची घरं दारं आणि शेतीवाडी आज उद्‌ध्वस्त धर्मशाळेसारखी मरणकळा दाखविते.

उत्तराखंडात अशी भूताची बनून राहिलेली सहा ते सात हजार खेडी आहेत. उत्तराखंडच्या निर्मितीसाठी लढणारे आज निराश आहेत. डेहराडून, नैनिताल, उधमसिंगनगर याच शहरी भागात विकास पोहोचला आहे. एकट्या पोैरी जिल्ह्यात या एका वर्षात 220 शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या आहेत.

या मुद्‌द्‌यावर सरकारला केवळ कागदी घोडे नाचवण्यात स्वारस्य आहे. भूमी एकीकरन, प्रस्ताव यांच्या योजना हाच एक पलायन आयोग आहे. पण तरीही ते किती सक्रीय आहेत हे आपण पहात आहोतच. शोकडो वर्ष पडून असलेल्या जमीनींमुळेच जगण्यासाठी माणसं घर सोडताहेत. वन्या जीवांचंही मोठं आव्हान आहे. शेती करण्यासाठी जंगल कापली पण आता तीच शेती जंगलाला परत मिळतेय. तरीही काही जण तग धरून शेती करताहेत. त्यांच्या शेतीवर पक्षी, माकडं, अस्वलं यांच्या टोळधाडी पडताहेत. कुलुप लावून बंद करून ठेवलेली जनावरेही बिबट्यांनी उचलून नेण्याच्या घटना घडल्या आहेत, असे चंदर यांनी स्पष्ट केले आहे.

विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या खंडीत भूखंडाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या उत्तराची मला अपेक्षा आहे. माझी आठ नऊ एकर जमीन विखुरलेली आहे. पर्वतीय जंगल कायम ठेवायचे असेल तर जमीन एकत्रीकरणला पर्याय नाही. केवळ शेतीच नाही तर ग्रीन हाऊस, रेसॉर्ट अशा पर्यावरणपुरक व्यवसायसाठीही जमीनीचे एकत्रीकरण आवश्‍यक आहे. वन्यजीव संरक्षणासाठीही ते आवश्‍यक आहे.

या माहितीपटात स्थलांतराच्यामुद्‌द्‌यावर सामाजिक अंगाने प्रकाशझोत टाकला आहे. 70 आणि 80च्या दशकात उत्तराखंडमधून अनेक जण लष्करात दाखल झाले. अनेक जण शहरांकडे वळाले. शेतात आणि घरात फक्त महिलाच असायच्या. पैसे कमावून ते गावाकडे सुरवातीला येतही असत. मात्र आता कोणी गावाकडे फिरकत नाही. येथे राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर असे दोन्ही स्वरूपाचे स्थलांतर आहे. घरगड्याची नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी पौरी, हल्दवणी, नैनिताल आणि देहराडून ही राज्यातील शहरे तर दिल्ली, मुंबई, चंदिगढ आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आहे. एवढेच नव्हे तर गावातील मुलीही शेती करणाऱ्या गावातील मुलापेक्षा शहरात भांडी विसळण्याचे काम करणाऱ्या मुलाला जीवनसाथी म्हणून निवडण्यास प्राधान्य देतात, असेही या माहिती पटाचे निर्माते सांगतात.

विद्यादत्त शर्मा

आमच्या नात्यामुळे या माहितीपटाची निर्मीती माझ्यासाठी एकाच वेळी सहज आणि आव्हानात्मक गोष्ट होती. कारण एखाद्या व्यक्‍तीरेखेच्या खोलात तुम्ही शिरता त्यावेळी त्यांचे अनेक कांगोरे तुमच्या जीवनाचा अवकाश व्यापून टाकतात. इथे तर एक शेतकरी, कार्यकर्ता, कवी, माजी महसूल अधिकारी आणि सभोवतालच्या बदल आपल्या कवितांमधये मांडणारा उर्जावान संवेदनशील असे अनेक कांगोरे असणारा नायक. हे सारे व्यापणारा अभिनेता मिळणे मुश्‍कील. म्हणून शर्मा यांनाच या माहितीपटाचा नायक बनवलं. कारण शर्मा गावाच्या दुर्देवाचे दशावतार गाणारा कवी, शाळा आधुनिक बनवण्यासाठी धडपडणारा, गावात बस आणण्यासाठी लढणारा, इमारतीवरील पावसाचे पाणी जमिनीत जीरवण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता आहेत. त्यांनी या फेब्रुवारीत देशात सर्वात मोठा म्हणजे 23 किलो वजनाचा मुळा पिकवला. जगातील सर्वात मोठा मुळा जपानमध्ये पिकला. त्याचं वजन 31 किलो होतं तो विक्रम मोडायचे ध्येय ते या वयात बाळगतात. या कष्टाला शबदरूप देताना शर्मा गातात, तुमचा राम मंदिरात विसावतो माझा राम शेतात राबतो…

स्थालांतराच्या सध्याच्या समस्येवर माझा माहितीपट चर्चा करतोय. आपण सर्वच स्थलांतरीत आहोत. आपल्या कोठे माहित आहे आपण कोठून आलोय. नेपळमधूम आलेल्या स्थलांतरीतांना भीती वाटतेय आपल्याला कधीही देशाबाहेर काढले जाईल. हे बाहेरचेच आमची शेती कसताहेत आणि आम्हाला खअयला घालताहेत, आम्ही त्यांना हुसकावायचं का? असा चंदर यांचा अंतर्मुख करणारा सवाल आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here