Most Sixes in ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात होत आहे. या सामन्यात डी कॉकने 140 चेंडूत 15 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. यासह तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. तसेच तो स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्याच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत आतापर्यंत पाच फलंदाजांनी 10 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा येथे आघाडीवर आहे.
रोहित शर्माने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात आतापर्यंत 17 षटकार ठोकले आहेत. या स्पर्धेत तो सध्या षटकार मारण्याच्या बाबतीत अव्वल आहे.
या यादीत दुसरे नाव आहे क्विंटन डी कॉकचे. दक्षिण आफ्रिकेच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने 5 सामन्यात 15 षटकार ठोकले आहेत.
या यादीत तिसरे नाव आहे कुसल मेंडिसचे. श्रीलंकेच्या या धडाकेबाद फलंदाजाने आतापर्यंत केवळ 4 सामन्यात 14 षटकार ठोकले आहेत.
येथे चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज डॅरिल मिशेल आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत मिशेलने 4 सामन्यात 11 षटकार ठोकले आहेत.
या यादीत पाचव्या क्रमाकांवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने 4 सामन्यात आतापर्यंत 10 षटकार मारले आहेत.