#CWC19 : विश्वचषक स्पर्धेत मॉर्गनचा षटकारांचा विक्रम

मॅंचेस्टर – इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने सतरा षटकारांचा विक्रम करीत धावांचा पाऊस पाडला, त्यामुळेच त्याच्या संघाने दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध 50 षटकांत 6 बाद 397 धावांचा डोंगर रचला.

मॉर्गन याने एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वचषक स्पर्धेत षटकारांचा विक्रम केला. त्याने सतरा षटकार मारले. त्याआधी रोहित शर्मा (भारत), अब्राहम डीव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) व ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) यांनी विश्‍वचषक स्पर्धेतील एकाच सामन्यात प्रत्येकी 16 षटकार ठोकले होते.

मॉर्गन याने विश्‍वचषक स्पर्धेतील चौथे वेगवान शतक केले. त्याने 57 चेडूंमध्ये शतक पूर्ण केले. यापूर्बी केविन ओब्रायन (50 चेंडू), ग्लेन मॅक्‍सवेल (51 चेंडू) व अब्राहम डीव्हिलियर्स (55 चेंडू) यांनी वेगवान शतक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.