कोल्हापूर- कोरोना महामारीत तब्बल 8 महिन्यानंतर राज्यातील सर्व धार्मिक स्थळ भाविकांसाठी खुली झाली आहेत. मुस्लिम बांधवांसाठी देखील नमाज पाठणासाठी मस्जिद उघडण्यात आल्या आहेत. आज शुक्रवार … मुस्लिम धर्मियांसाठी शुक्रवार ची नमाज अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अनलॉक नंतर टप्प्याटप्प्याने धार्मिक स्थळ उघडली आणि अनलॉक नंतर च्या पहिल्या शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी कोल्हापूरच्या मुस्लिम बोर्डिंग मध्ये असणाऱ्या मज्जिद मध्ये एक हजारपेक्षा अधिक मुस्लिम बांधव एकत्र आले.
नमाज पाठणासाठी उपस्थीत असणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोना पार्श्वभूमीवरती शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलंय. विशेष म्हणजे कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवरती सर्वांनी मास्क परिधान केला होता , सेनेटायझर चा वापर केला होता…सोशल डिस्टंसिंग पाळलं होतं आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी शुक्रवारची की नमाज आता केली आहे…