मुंबई : जगात कोरोनाच्या रुग्णांची 77 लाखांहून अधिक झाली आहे. तर यामुळे मृतांची संख्या आता चार लाख 27 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 1 लाख 40 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 77 लाख 25 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 27 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 39 लाख 19 हजार रुग्ण बरे झाले आहेत.
जगातील 60 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांच्या घरात आहे. वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 309,603 रुग्ण आहेत. तर 8,890 बळी कोरोनामुळे गेले आहेत. सध्या भारतात 146,383 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 154,330 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,116,672 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर 116,825 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 829,902 कोरोनाबाधित आहेत तर 41,901 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर यूकेत 41,481 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 292,950 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,223 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 236,305 हजार इतका आहे.