इफ्फी-51 मध्ये माहितीपट कमी, लघुपट अधिक

माहितीपट अत्यंत महत्वाचे माध्यम : हौबम पबन कुमार

पणजी – 51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फी सध्या गोव्यात सुरू असून या चित्रपट महोत्सवासाठी आलेल्या प्रवेशिकांमधून चित्रपटांची निवड करणे हे सर्व ज्युरी सदस्यांसाठी मोठे आव्हान होते. मात्र एकमताने ही निवड केली, असे प्रतिपादन भारतीय पॅनोरामाच्या ज्युरी समितीचे सदस्य जॉन मॅथ्यू मॅथन यांनी पत्रकार परिषदेत केले. फिचर फिल्म्स, विभागाचे अध्यक्ष जॉन मॅथ्यू मॅथन, बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन कुमार, फिचर फिल्म ज्युरी समितीच्या सदस्य जादूमोनी दत्ता यांच्यासह इतर ज्युरी सदस्य या पत्रपरिषदेला उपस्थित होते.

फिचर फिल्मच्या ज्युरी समितीत 12 सदस्य असून ते सर्व उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तर आहेतच शिवाय विविध चित्रपट विषयक संस्था आणि व्यवसायांमधील महत्वाच्या व्यक्‍ती आहेत. हे सगळे जण मिळून भारतीय चित्रपटांमधील विविधरंगी पैलूंचे एकत्रित रूप आहेत.

बिगर-फिचर फिल्म गटात आलेल्या प्रवेशिकांविषयी बोलतांना दिग्दर्शक आणि बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन कुमार यांनी सांगितले, आधीच्या वर्षांच्या तुलनेत, यंदाच्या महोत्सवात अगदी कमी माहितीपट आले आहेत.लघुपटांच्या तुलनेत माहितीपटांची संख्या कमी आहे. बिगर फिचर फिल्म विभागाला माहितीपट आणि लघुपट विभाग असे म्हटले जावे अशी सूचना करतानाचा, हौबम पबन कुमार यांनी एक माध्यम म्हणून माहितीपटांचे महत्व सांगितले.

यंदाच्या महोत्सवात अनेक युवा चित्रपट निर्माते आहेत. यंदा 60 ते 70 पेक्षा अधिक युवा चित्रपट निर्माते आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. या विभागातील पहिला सिनेमा “सांड की आंख’ देखील युवा चित्रपट निर्मात्याने बनवला आहे. असे कुमार म्हणाले.
तुषार हिरानंदानी निर्मित “सांड की आंख’ चित्रपटाची उद्घाटनाचा चित्रपट म्हणून निवड करण्यामागे या चित्रपटात असे अनेक पैलू आहेत, जे ज्युरी सदस्यांना विशेष भावले, असेही कुमार म्हणाले.

चित्रपटनिर्मात्या आणि पत्रकार तसेच, ज्युरी सदस्य संघमित्रा चौधरी, यांनी यंदाच्या ईफ्फीमध्ये आलेल्या नवोदित दिग्ददर्शकांनी त्यांच्या चित्रपटांसाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. या सर्वांनी आपल्या चित्रपटातून समकालीन विश्व मांडले आहे, असे त्या म्हणाल्या.
इंडियन पॅनोरामाच्या बिगर फिचर फिल्म गटात, अंकित कोठारी यांचा “पंछिका’ हा गुजराती चित्रपट, उद्घाटनाचा चित्रपट आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.