मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूर एका सेलिब्रिटी कुटुंबातील आहे. यामुळे ती लहानपणापासूनच चर्चेत आली आहे. शालेय जीवनातही तिचे बालपण सामान्य मुलासारखे नव्हते. जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सांगितले की ती लहान असतानाही कॅमेरा हा तिच्या आयुष्याचा एक भाग होता. लोक फोटो काढायचे आणि ग्रूमिंग नसेल तर तिची चेष्टाही करायचे. माझ्या फोटोशी छेडछाड करून पॉर्न लाईक पेजवर पोस्ट केल्याची धक्कादायक घटनाही तिने सांगितली.
श्रीदेवी – बोनी कपूर यांच्या मुली जान्हवी janhvi kapoor आणि खुशी या नेहमीच चर्चेत असतात. लहानपणापासून या दोघींचे फोटो मॅगझीनमध्ये प्रसिद्ध होतात. जुने फोटोपाहून चाहते आश्चर्यचकित होतात. जान्हवीने सांगितले की, लहानपणी कॅमेऱ्याला सामोरे जाणे इतके सोपे नव्हते. जान्हवी म्हणते, ‘कॅमेरा हा नेहमीच माझ्या आयुष्याचा भाग राहिला आहे. अगदी लहानपणी आम्ही बाहेर गेलो की तो आजूबाजूला असायचा.
जान्हवी janhvi kapoor पुढे म्हणाली की, जेव्हा माझा फोटो इंटरनेटवर आला तेव्हा मी फक्त 10 वर्षांचा होते. जेव्हा मी शाळेच्या कॉम्पुटर लॅबमध्ये पोहोचली तेव्हा माझ्या सोबत शिकणारे माझ्या वयाचे मुलं माझे फोटो कॉम्प्युटर स्क्रीनवर बघत होते. हे फोटो पापाराझींनी काढले आहेत. जान्हवीने सांगितले की, त्यावेळी ती या सर्व गोष्टींसाठी तयार झाली नव्हती आणि मी फार अस्वस्थ दिसत होती. या फोटोंमुळे मी लोकप्रिय झाली नाही उलट शाळेतील मुलांपेक्षा वेगळी वाटू लागली. जान्हवी janhvi kapoor म्हणाली, ‘माझ्या मित्रांनी माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले, वॅक्सिंग न केल्यामुळे मला ट्रोल करायचे.’
जान्हवी कपूरने janhvi kapoor सांगितले की, ‘जेव्हा मी किशोरवयात होती, तेव्हा माझे मॉर्फ केलेले फोटो काही चुकीच्या पोर्न पेजवरही पोस्ट करण्यात आले. आताच्या काळात एआय सारखे प्रगत तंत्रज्ञान आले आहे, ज्याच्या मदतीने गुन्हे सहज घडू शकतात, अशी चिंता तिने व्यक्त केली.