Pankaj Tripath : हे संपूर्ण जग एक रंगभूमी आहे, आणि आपण सर्वजण आपापल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमिकेची पुन्हा एकदा होणारी निर्मिती असते आणि त्यावेळी भावनांतून इतरांचे मनोरंजन केले जात असते.
प्रतिथयश, व्यावसायिक अभिनेता होण्यासाठी प्रत्येक गोष्टीविषयी मनामध्ये सह-अनुभूती वाटणे आवश्यक आहे, असे अभिनेते पंकज त्रिपाठी म्हणाले. “इफ्फी’मध्ये “मास्टरक्लास’मध्ये ते बोलत होते. अभिनय एक व्यापक उद्देश पूर्ण करतो.
तसेच विविध दृष्टीकोन समजून घेऊन व्यक्तीला अभिनयामुळे चांगला मानव बनता येते. ज्यावेळी तुम्ही स्वत: दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये शिरता आणि त्या व्यक्तीचे विचार, त्यांच्या भावना आणि त्यांचे दृष्टीकोन समजून घेता, तेव्हा तुम्ही एक चांगला माणूस बनता. असे यावेळी त्रिपाठी म्हणाले.