नवी दिल्ली : संपूर्ण देशात मान्सूनने हजेरी लावली आहे. दडी देऊन बसलेला पाऊस आता चांगलाच संपूर्ण देशात बरसत आहे. आसाम, हिमाचलप्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यात पावसाचा जोर आता वाढत आहे.
उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसाने डोंगराळ भागातील जमीन भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. घराबाहेर पडणे कठीण झाले असून नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
#WATCH | Following landslides due to heavy rainfall in Mehad and Cafeteria Morh of Ramban district, vehicular traffic at Jammu Srinagar National Highway has been blocked. pic.twitter.com/yO72PRGw7a
— ANI (@ANI) June 26, 2023
तर तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. येथे अनेक शहरांमध्ये ढगफुटी झाली आहे. अचानक ढगफुटी झाल्याने लाखोंचे नुकसान यात होत आहे. शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये रविवारी ढगफुटी झाल्यने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलन आणि हमीरपूर या ठिकाणी देखील पूर आल्याने अनेक वाहने पाण्यात वाहून गेली आहेत.
#WATCH | The flood situation in Assam’s Barpeta district is still grim as nearly 1.70 lakh people have been affected.
NDRF, SDRF, Fire & Emergency Services personnel are engaged in the rescue operations.
(Visuals from Barpeta district) pic.twitter.com/6G9nQ3gkjq
— ANI (@ANI) June 26, 2023
यामुळे येथे असलेल्या नागरिकांसह पर्यटकांना देखील ढगफुटीचा सामना करावा लागत आहे. कुल्लूममधील मोहल या ठिकाणी अचानक झालेल्या ढगफुटीने वाहने एका मोठ्या खड्ड्यात अडकून पडली आहेत. सकाळपासूनच ही वाहने जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.