चिंबळी- वाकी बुद्रुक (ता. खेड) गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गावातील विविध विकासकामे पुढील काळात करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार दिलीप मोहिते यांनी दिली. वाकी बुद्रुक गावातील काकडा आरतीच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आमदार दिलीप मोहिते यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार मोहिते बोलत होते.
तालुक्यातून विक्रमी लीड दिल्याबद्दल सर्व वाकी मधील मतदारांचे त्यांनी आभार मानले. यावेळी वाकी बुद्रुक आणि वाकी खुर्द या गावांना दळणवळण सोयीचे व्हावे यासाठी भामा नदीवर एक पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी मोहिते यांच्याकडे केली. यावेळी विविध मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.