मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्री संत तुकाराम महारांजाच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पुण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताचे बॅनर जागोजागी लावण्यात आले आहेत. मात्र भाजपकडून लावण्यात आलेल्या एका पोस्टर मध्ये भगवान विठ्ठलाच्या प्रतिमेहून मोदींची प्रतिमा मोठी असल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविकांत वरपे याना १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू येथील स्वागताच्या फ्लेक्सवर पिंपरी चिंचवड भाजपा पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलापेक्षा मोदींचा फोटो मोठा लावला आहे.यामुळे वारकरी संप्रदायाचा अपमान झाला असून याबद्दल भाजपाने माफी मागावी अशी भूमिका मी घेतली होती. यांबद्दल मला कलम १४९ अंतर्गत नोटीस दिली आहे. pic.twitter.com/y5pVSoIINX
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) June 13, 2022
तर कारवाई करण्यात येईल …
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू येथील स्वागताच्या फ्लेक्सवर पिंपरी चिंचवड भाजपा पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलापेक्षा मोदींचा फोटो मोठा लावला आहे.यामुळे वारकरी संप्रदायाचा अपमान झाला असून याबद्दल भाजपाने माफी मागावी अशी भूमिका मी घेतली होती. यांबद्दल मला कलम १४९ अंतर्गत नोटीस दिली आहे. अशी माहिती वरपे यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. या नोटीस मध्ये म्हंटले आहे की, आपण अथवा आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपणाला सर्वस्वी जबाबदार धरण्यात येऊन प्रचलित कायद्यानुसार आपल्यावर कारवाई करण्यात येईल. यामुळे कायदा व सुव्यस्थेचा कोणताही प्रश्न निर्मण होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे.
या नोटीशीलाही वरपे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. ही नोटीस मी स्वीकारत असून “शरद युवा सवांद” दौऱ्यासाठी मी बुलढाणा येथे आहे. जोपर्यंत मा.चंद्रकांत पाटील व पिं-चिंचवड अध्यक्ष आ.महेश लांडगे हे वारकरी संप्रदायाची माफी मागत नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा आम्हांला आमचा विठ्ठल सदैव मोठा आहे. असे त्यांनी ट्विट करीत म्हंटले असून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत .
भाजपकडून वादग्रस्त बॅनर हटवले
राष्ट्रवादीच्या वरपे यांच्याकडून आक्षेप घेतल्यानंतर भाजपकडून वादग्रस्त पोस्टर हटवण्यात आले होते. शिवाय त्याजागी दुसरे एक पोस्टर लावण्यात आले होते. त्याच्याबाबतही माहिती वरपे यांनी ट्विट केली. ” पांडुरंगापेक्षा PM मोदींचा फोटो मोठा : भाजपच्या वरिष्ठांकडून वादग्रस्त बॅनर हटवण्याचे आदेश.चला, भाजपाने मान्य तर केले की पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा होता. पांडुरंगा भाजपला सद्बुद्धी दे.” अशा आशयाचे ट्विट वरपे यांनी केले होते.