मुंबई – कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, असा आरोप राज्यातील विरोधीपक्षांकडून केला जातोय. विरोधकांच्या या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत सारखीच असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. भातखळकरांनी याबाबत ट्विट करताना, “कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजीना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा” अशी खिल्ली उडवली.
ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच – संजय राऊत
कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजीना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा.https://t.co/w92FGc5aouhttps://t.co/mJMRKmflXt
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 3, 2020
तत्पूर्वी, “उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असं सागण्याचं धाडस करावं,” असं आव्हान संजय राऊत यांनी विरोधकांना दिल होत.
“उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत. ज्या प्रकारे प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती.