संघाच्या ‘नसबंदी’च्या इच्छेसाठी मोदींनी कायदा करावा

नवी दिल्ली : देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणे आवश्‍यक आहे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण हा विषय आहे असे दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक म्हणाले,’देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा यावा मात्र त्यांना माहिती नाही महाराष्ट्रात यासंदर्भातील कायदा आहे. आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा याबाबतचा कायदा आहे. असे असतांना सुद्धा मोहन भगवंतांची इच्छा असेल कि भारतात पुरुषांची जबरदस्तीने नसबंदी व्हावी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर कायदा आणायला हवा. आपल्या सर्वाना माहिती आहे की, यापूर्वी सुद्धा नसबंदीचे काम परिणाम झाले आहे. असं म्हणत त्यांनी मोहन भगवत यांच्यावर टीका केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×