काठमांडू : जगातील सर्वात उंचीने कमी असणाऱ्या खगेंद्र थापा मगर यांचे नुकतेच निधन झाले त्यांची उंची 67.08 सेंटीमिटर होती. त्यांच्यावर काठमांडूपासून 200 किमीवरील पोखारा येथील रुग्णालायात न्युमोनियाचे उपचार सुरू होते. त्या गावातच ते आपल्या आई वडीलांसह रहात असत.
न्युमोनियावर उपचारासाठी त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र यावेळी त्यांच्या हृदयाला संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांचे निधन झाले, असे खगेंद्र यांचे बंधू महेश थापा यांनी सुांगितल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.
खगेंद्र यांची जगातील सर्वात लहान बटुमुर्ती म्हणून त्यांच्या 18 व्या वाठदिवसाला 2010 मध्ये निवड करण्यात आली होती.
त्यांचे वडील सांगतात, तो जन्मला आला त्यावेळी इतका लहान होता, की तळहातावर मावत असे. तो इतका लहान असल्याने त्याचे संगोपन करणे खरंच खूप कठीण होते.
खगेंद्र हे जनतेचे लक्ष चटकन वेधून घेत असत. त्यांच नियुक्ती पर्यटनासाठी नेपाळचे सदिच्छा दूत म्हणुन 2011 मध्ये करण्यात आली होती. मात्र त्यानंतर नेपाळच्याच चंद्र बहादूर डांगी यांची जगातील सर्वात बटूमुर्ती म्हणून नोंद करण्यात आली. त्य्यांची उंची 54.6 सेंटीमिटर होती. मात्र डांगी यांच्या निधनानंतर 2015 मध्ये खगेंद्र यांची पुन्हा त्या पदासाठी निवड करण्यात आली.
2010 मध्ये खगेंद्र यांना प्रथमत: भेटलेले गिनस वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य संपादक क्रेग ग्लेन्डे म्हणाले, खगेंद्र या पुढे आपल्यात नाही हे ऐकून मला खूप वाईट वाटले. त्याला भेटणाऱ्या प्रत्येकाकडे पाहुन इतका गोड हसायचा की पाहणाऱ्याचे हृदय द्रवून जायचे. तुमचं वजन ज्याचवेळी सहा किलो असते त्यावेळी आणि जगात सामान्य जीवन जगण्यासाठी तुम्हाला मर्यादा येतात त्यावेळी तुमचं जीवन अधिक आव्हानात्मक असते. मात्र तरीही खगेंद्र यांनी आपल्या चेहऱ्यावरचे हास्य कधी ढळू दिले नाही. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटणे, त्याची कथा जगाला सांगणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद होते.