भोर -आधुनिक पद्धतीने अध्यापन केले, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी नक्कीच गरूडझेप घेईल, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी केले. हरिश्चंद्री प्राथमिक शाळेत ई-लर्निंग संचाच्या उदाघाटनप्रसंगी ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर यांच्यावतीने जि. प. प्राथ. शाळा, हरिश्चंद्री (ता. भोर) यांना एक दूरचित्रवाणी संच आणि पहिली ते चौथी अभ्यासक्रमासाठी सॉफ्टवेअर देण्यात आले, यासाठी. रोहन बाठे यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वात या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोलाची भर पडेल,स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थीही आधुनिक अध्यापनाने गरुड झेप घेतील, त्यांच्या ज्ञानकक्षा शिक्षकांच्या प्रयत्नाने उंचवतील, असे प्रतिपादन बाठे यांनी यावेळी केले. यावेळी सरपंच संध्याताई गाडे, उपसरपंच दत्तात्रय बाठे, सदस्या वर्षा गाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश गाडे , अंगणवाडी सेविका स्वाती पाचकाळे, मदतनीस सविता चाळेकर यांसह पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक कमलाकर मोहिते यांनी प्रास्ताविक केले.