पंजाबमधील पटियाला येथे खलिस्तानींच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चावरून हिंसाचार उसळला होता. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान आज पटियालामध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी ‘खलिस्तानविरोधी मोर्चा’वरून दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Patiala | Morning visuals from outside Shri Kali Devi Temple after two groups clashed near the temple yesterday
Shiv Sena leader Harish Singla has been arrested in connection with the incident.
Locals say the situation is peaceful & devotees continue to visit the temple today. pic.twitter.com/aoc2AYekrK
— ANI (@ANI) April 30, 2022
पटियाला शहरात शुक्रवारी खलिस्तानविरोधी मोर्चावरून दोन गटांमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर आज शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 पर्यंत या सेवा बंद राहतील. पंजाब सरकारच्या गृह विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
Mobile internet services temporarily suspended from 9:30 am to 6 pm in Patiala today: Dept of Home Affairs, Government of Punjab pic.twitter.com/uYu99aECzU
— ANI (@ANI) April 30, 2022
दरम्यान, पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी ‘खलिस्तानविरोधी मोर्चा’वरून दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. शिवसेनेच्या खलिस्तान विरोधी मोर्चादरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरिय बैठक घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.