कॅप्टन अमरिंदर सिंग पटियालामधूनच निवडणूक लढवणार: सिद्धूसाठी सोडणार नाही मैदान, ट्विटरवर केले जाहीर

पटियाला – पंजाबमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षादरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 2022 मध्ये पटियालामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी पटियाला व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवणार नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीट करत हा निर्णय जाहीर केला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना ही घोषणा केली आहे. यावेळी पटियालाला पंजाबमधील सर्वात स्वच्छ शहर बनवल्याबद्दल त्यांनी पटियालाच्या जनतेचे अभिनंदनही केले आहे. त्यांनी जाहीर केले की त्यांचे कुटुंब 400 वर्षांपासून पटियाला येथे राहत आहे आणि नवज्योतसिंग सिद्धूमुळे ते पटियाला सोडू शकत नाहीत. असेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.