पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्यांना 61 प्रतिभावंतांचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली : देशातील मॉब लिचींग प्रकरणावरून प्रतिभावंतांच्या वर्गामध्ये दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटना आणि श्रीरामाचे नाव घेत होत असलेल्या हिंसाचारावरून संताप व्यक्त करत 49 प्रतिभावंतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीले होते. मात्र आता या 49 प्रतिभावंतांना 61 प्रतिभावंतांनी खुले पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे.
61 personalities including actor Kangana Ranaut, lyricist Prasoon Joshi, Classical Dancer and MP Sonal Mansingh,Instrumentalist Pandit Vishwa Mohan Bhatt, Filmmakers Madhur Bhandarkar& Vivek Agnihotri write an open letter against ‘selective outrage and false narratives’. pic.twitter.com/RGYIxXeJzS
— ANI (@ANI) July 26, 2019
हे खुले पत्र लिहिणाऱ्यांमध्ये अभिनेत्री कंगना राणौत, गीतकार प्रसून जोशी, शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांच्यासह 61 जणांचा समावेश आहे. जेव्हा आदिवासींना माओवादी लक्ष्य करतात, तेव्हा तुम्ही गप्प का बसता? असा सवाल या प्रतिभावंतांनी पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 49 प्रतिभावंतांना केला आहे. तसेच त्यांच्या ठरावीक बाबींवर चिंता करण्याच्या वृत्तीवर टीका केली आहे. दरम्यान, देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींनापत्र लिहिले होते, या पत्रांमध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच देशात असंतोषाचे दमन होणार नाही असे वातावरण निर्माण करण्याची विनंती या मान्यवरांनी नरेंद्र मोदींना केली होती.