मनसेचे पुन्हा खळ्ळ खट्याक; बिवंडी महामार्गावरील टोल नाका फोडला

भिवंडी – ठाणे – भीवंडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा इशारा वारंवार देऊनही खड्डे तसेच असल्याने संतप्त झालेल्या मनसैनिकांनी या मर्गावरलि टोल नाका फोडला. मनसेनेच्या या खळ्ळ खट्याक आंदोलनाला समाज माध्यमांत जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मनसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. टोलनाका फोडणअऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली.

भिंवडी-ठाणे रस्त्यावरील खड्डे त्वरीत बजवण्यात यावेत, अन्यथा टोल नाका तोडून टाकण्यात येईल असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.मात्र त्यानंतरही रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या टोलनाक्‍याची तोडफोड केली.

मनसेचे ठाणे जिल्ह्याचे सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भिवंडी-ठाणे रोडवरील कशेळी येथे हा टोला नाका आहे. पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅट आणि लाकडी दांडक्‍यांच्या सहाय्याने टोल नाक्‍याच्या काचा फोडल्या. भिवंडी-ठाणे हा महामार्ग नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. येथील टोल कंपनी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाकडे सपशेल दुर्लक्ष केलेले आहे.

मनसेने या मार्गासाठी अनेकदा आंदोलने केलेली आहेत. मात्र या मार्गाकडे नेहमीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. आमच्या आंदोलनांची दखल ना टोल कंपनीने घेतली, ना सार्वजनिक बांधकाम विभागाने. यामुळेच आम्ही आज हा टोलनाका फोडला, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, आजच्या या आंदोलनानंतर पोलिसांनी टोलनाका फोडणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेतले

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.