चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा; रुपाली चाकणकरांची अजित पवारांकडे मागणी

पुणे – मागील अनेक दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुगलबंदी रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यात आघाडीवर असतात. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकरण यांनी उडी घेतली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.

चाकणकर यांनी ट्विट करून म्हटलं की, चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा.


‘देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.