मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकीसाठी येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. भाजप विरूद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट असा हा सामना रंगणार आहे. शुक्रवारी (दि.14) भाजपकडून मुरजी पटेल यांनी तर शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपला मुख्यमंत्री शिंदे गटाचा पाठिंबा तर उद्धव ठाकरे गटाला राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
अंधेरी पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना राज ठाकरे यांनी घेतलेली मुख्यमंत्र्याची भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत निवडणुकीबाबत चर्चा झाली असावी तसेच आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला का याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही मात्र, काॅंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्यामुळे मनसेचा भाजपला पाठिंबा मिळणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला तर मराठी मते मुरजी पटेल यांना मिळण्याची शक्यता आहे. याचा भाजपला मोठा फायदा होईल.
भाजप उमेदवार मुरजी पटेल 6 वर्ष निवडणूक लढवू शकत नाहीत, उमेदवारी रद्द होणार?, ठाकरे गटानं घेतला आक्षेपhttps://t.co/N5mGP8mfSg
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. मात्र मनसे-भाजप युती होणार की मनसे स्वबळावरच निवडणुक लढवणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.