महिला आशिया चषक २०२२ स्पर्धेचा ( WomenAsiaCup ) अंतिम सामना भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून श्रीलंकेला धूळ चारत सातव्यांदा महिला आशिया चषकवर ( WomenAsiaCup ) आपले नाव कोरले आहे. सामान्याच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या हा निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि संपूर्ण श्रीलंकन संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ ६५ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने फक्त २ गडी गमावून हा सामना सहज जिंकला.
भारतीय महिला संघाने या स्पर्धेचे सातवे विजेतेपद जिंकले आहे. भारताने २००४, २००५-०६, २००६, २००८, २०१२ २०१६ आणि आता २०२२ मध्ये आशिया चषक स्पर्धा ( WomenAsiaCup ) जिंकण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर २०१८ मध्ये म्हणजेच गेल्या मोसमात भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता, परंतु बांगलादेशने भारताचा पराभव करत प्रथमच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामात भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला आहे.
T20 World Cup | शेवटी ठरलं! बुमराहच्या जागी ‘हा’ खेळाडू जाणार ऑस्ट्रेलियाला
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या दमदार गोलंदाजीसमोर विरोधी संघाने १० धावांतच ४ गडी गमावले. यानंतर ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले आणि संघाच्या धावसंख्येवरही ब्रेक लागला. परिणामी २० षटकांत श्रीलंकन संघ ९ गडी गमावून फक्त ६५ धावांपर्यंत मजल मारू शकला.
#AsiaCup2022 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 🏆
Well done, #TeamIndia! 👏 👏#INDvSL pic.twitter.com/qYBP4t6WMV
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
भारताच्या डावाची सुरुवातही थोडी खराबच झाली होती. कारण संघाने पहिले दोन गडी अगदी स्वस्तात गमावले. मात्र त्यांनतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताला सहज विजय मिळवून दिला. मंधानाने दमदार खेळी करत २५ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकीय परी खेळली.
We 🇮🇳 are CHAMPIONS! What an amazing run by @BCCIWomen at the #AsiaCup2022.
Congratulations to @ImHarmanpreet & her team for raising the bar in women’s cricket. The convincing win in the final is a testimony to #TeamIndia’s consistency and class 👏 pic.twitter.com/M7PJyqq0Xl
— Jay Shah (@JayShah) October 15, 2022