मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. ब्रीच कँन्डी रुग्णालयात मिताली यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
ठाकरे घराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता आजोबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आजोबा झाल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच त्यांचे इतर कुटुंबियही रुग्णालयात दाखल झाले आहेत. नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचे वातवरण असल्याचे पाहायला मिळत आहे.
सचिन मोरे यांनी एक पोस्ट टाकत “आमचे साहेब आजोबा झाले…युवराजांचे आगमन झाले” असे लिहिले. तसेच राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.