पुणे – भोंगे आणि लाऊडस्पीकर प्रकरण तापले असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते कुमठेकर रस्त्यालगतच्या खालकर चौक मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले. दरम्यान, ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधणे टाळले. तर, यावेळी राज यांनी परिधान केलेली “भगवी’ शाल सर्वांसाठीच “लक्ष्य’वेधी ठरल्याची चर्चा होती.
संत ज्ञानेश्वरांनी रेड्या कडून वेद म्हणवून घेतले होते. सहजच आठवलं त्याचा नास्तिकांनी, नव पुरोगामी यांनी केलेल्या महाआरती शी संबंध नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 17, 2022
दुसरीकडे युवासेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतही हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेनेसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांना टोला लगावला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचे ट्वीट
‘संत ज्ञानेश्वरांनी रेड्या कडून वेद म्हणवून घेतले होते. सहजच आठवलं त्याचा नास्तिकांनी, नव पुरोगामी यांनी केलेल्या महाआरती शी संबंध नाही. दुसरीकडे युवासेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतही हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेनेसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांना टोला लगावला आहे.