पुणे – मनमोहक हास्य, आरसपानी सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याची सम्राज्ञी माधुरी दीक्षितची जादू आजही कायम आहे. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
माधुरीच्या सोशल मीडियावरील ऍक्टिव्हिटीवर तिच्या चाहत्यांची नेहमी नजर असते. तर, माधुरीही आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या आउटफिट्समधील फोटो पोस्ट करत असते.
View this post on Instagram
असेच काही सुंदर फोटो पुन्हा एकदा माधुरीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. माधुरीचा हा ग्लॅमर्स लूक पाहून फॅन्स अक्षरशः तिच्या प्रेमात वेडे झाल्याचे पाहिला मिळत आहे. या नवीन फोटोशूटमध्ये माधुरी खूप मादक आणि बोल्ड दिसत आहे.
View this post on Instagram
आताही तिने आपल्या इन्स्टापेजवर नव्या फोटोशूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, ‘दिल ने कहा, देखे जो जलवे हुस्न यार के, लाया है कौन उनको फलकसे उतार के’.
वेगवेगळ्या सुंदर पोशाखातील अनेक फोटो तिने यामध्ये शेअर केले आहेत. एका गोल्डन विंग्ज पोशाखात स्नूकर खेळत असतानाचेही फोटो यामध्ये आहेत. वयाचे अर्धशतक पार करूनही माधुरी तितकीच सुंदर दिसते हेच यामधून दिसून येते.