मुंबई – विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत. मात्र, शनिवारी चार अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेची विधानसभेतील आमदारांची संख्या ६० वर पोहचली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.
Shiv Sena gets support of 2 more MLAs of Prahar Janshakti Party. Bachchu Kadu of Achalpur assembly constituency and Rajkumar Patel of Melghat assembly constituency met Shiv Sena Chief Uddhav Thackeray last night and extended their support to him. #Maharashtra pic.twitter.com/VaWe4jLQ6T
— ANI (@ANI) October 27, 2019
बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.
विधानसभा निवडणुक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर आता प्रहर जनशक्तीच्याही या दोन आमदारांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय. त्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्या आता 60 झाली आहे.
शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयोतून व्हावीत. दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करणे, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघातील समस्या सोडवणे. अशा अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.