पुणे – रोटरी डिस्ट्रिक 3131 तर्फे मिक्स विंटर कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आजपासून रविवारपर्यंत आरएस खांदवे येथील क्रिकेट मैदानावर होणार आहे.
यंदा प्रथमच लिलावपद्धतीने संघातील खेळाडूंची निवड करण्यात आली.
या स्पर्धेत 6 संघ सहभागी झाले असून घेण्यात आलेल्या लिलावात फय्याज लांडगे याला 25 हजार रुपयांचे अल्टीमेट ऍडव्हेंचर्सने आपल्याकडे घेतले. तोच या स्पर्धेतील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला.
स्पर्धेत प्रत्येक संघात एकूण 11 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 15 षटकांचे होणार आहेत.
स्पर्धेतील संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली असून अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 17 जानेवारीला होणार आहे.