नारायणगाव (पुणे) – धुळे येथील विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी जुन्नर तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपा युवा मोर्चा जुन्नर तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतिक जाधव, उपाध्यक्ष दीपक सरजीने, सरचिटणीस उमेश साळी, जुन्नर शहर अध्यक्ष मयूर दिवेकर, सरचिटणीस दिनेश परदेशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तीस टक्के शुल्क माफी मिळावी यासह इतर शैक्षणिक मागण्यांसाठी अ.भा.वि.प. च्या विद्यार्थ्यांनी बुधवारी धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांचा ताफा अडविला होता. विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी यावेळी अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. यात काही विद्यार्थी जखमी झाले. यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जुन्नर तालुक्याच्या वतीने करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसत्काळ सोडवाव्यात, अन्यथा भाजप युवा मोर्चा आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आला.