मुंबई – हॉलीवूडमधील अभिनेत्री मिलिसेंट सिगमंड आता दिव्यांग कार्यकर्ती हेलन केलरचा रोल साकारणार आहे. “हेलन ऍन्ड टीचर’ या आगामी सिनेमात मिलिसेंट ही भूमिका करणार आहे. राचेल ब्रोसनाहन हे हेलनच्या शिक्षकाचा एली लुसिवनचा रोल करणार आहेत. आतापर्यंत हेलनच्या भूमिकेसाठी बहिरी नसलेल्या कलाकारांची निवड केली जायची.
यावेळी प्रथमच एक कर्णबधिर अभिनेत्री हेलन केलरच्या भूमिकेत दाखवली गेली असणार आहे. त्यामुळेच हेलन केलर साकारणारी मिलिसेंट सिगमंड ही कर्णबधिरांची प्रतिनिधी असणार आहे. म्हणूनच ब्रोसनाहन आणि मिलिसेंटचे नाते उंचीवर असणार आहे. 1900 च्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील रेडक्लिफ कॉलेजमध्ये पदवी मिळवण्यासाठी हेलन केलरने केलेला अत्यंत कष्टप्रद प्रवास या सिनेमात दर्शवलेला असणार आहे.
यापूर्वी बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जीने हेलन केलरच्या कथेवरील “ब्लॅक’ साकारला होता. हेलन केलरची कथा पूर्वी विल्यम गिब्सन यांच्या “द मिरॅकल वर्कर’ आणि डिस्ने थिएटरच्या “द मिरॅकल वर्कर्स’सारख्या अनेक सिनेमांमधून मांडण्यात आली आहे. आता कर्णबधिर ऍक्ट्रेस स्वतः कर्णबधिर आणि अंध तरीही शिक्षणासाठी आसुसलेली हेलन केलर साकारणार आहे, हे विशेष आहे.