ट्रॅक्टर चालवून हर्षवर्धन पाटील यांनी जिंकली शेतकऱ्यांची मने

इंदापूर  – साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्त्व आहे. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा…’ असे म्हणत हा सण साजरा करतात त्याला कारणही तसेच आहे.

नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील या दिवशी केली जाते. या शुभमुहूर्ती कळाशी येथील अनिल सूर्यवंशी यांनी घेतलेला नवीन ट्रॅक्टरचे पूजन राज्याचे माजी

मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले व त्या प्रसंगी त्यांनी ट्रॅक्टरची ट्रायल घेतली या घटनेमुळे उपस्थितांची मने आनंदी झाली. अनिल सूर्यवंशी यांच्या परिवारास यानिमित्ताने हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.