शरीरातील उष्णता कमी करणारी बहुगुणी वनौषधी दूधवेली

दूधवेली बांधाच्या कडेला येतात. पाने हृदयाकृती पसरट असतात. पान तोडले असता त्यातून पांढरसर चिक बाहेर निघतो जो दूधासारखा पांढरा व चवीस मधुर असतो. ह्याची फळेदेखील गोड असतात. बी तंतूयुक्‍त असते व ते वाऱ्याने उडून दुसरीकडे रूजते त्यामुळे दूधवेल मैदानात तसेच पाणवठ्याजवळ कुठेही उगवताना दिसते.याचे औषधी महत्त्व असे . ( hoya pendula benefits in marathi )

लघवीचे विकार बरे होतात – ज्यांना लघवीच्या ठिकाणी जळजळ व अुागआग होत असेल त्यांना दुधवेलीचं मुळं पाण्यात उगाळून सकाळी अनशेपोटी द्यावी. तसेच दोन कपाला पाव एवढा काढा उरवावा. काढा करताना दूधवेलीची मुळी स्वच्छ धुवून मग पाण्यात उकळवावे. दुधवेलीच्या मुळ्या खूप औषधी आहेत. ह्याच्या काढयाने लघवीचे विकार बरे होतात.

शरीरातील उष्णता बाहेर पडण्यासाठी – दूधवेल हे शीतल औषध आहे. याने दाह शमन होतो. त्यामुळे याचा काढा दोन चमचे सकाळ-संध्याकाळ घेतला असता उष्णतेचे विकार बरे होतात.

पित्तशामक – अंगावर पित्त उठले असता मुळीचा रस चोळून लावावा. दूधवेल ही एक पित्तशामक औषधी आहे. दूधवेलीच्या काढ्याने अनेक पित्तविकार बरे होतात.( hoya pendula benefits in marathi )

ऍलर्जीवर – ऍलर्जी म्हणजे शरीरावर काही पदार्थांनी पुरळ किंवा त्यालाच इंग्रजीत रॅशअसे म्हणतात तो उठतो मात्र दूधवेलीच्या चूर्णाच्या लेपाने ऍलर्जी जाते व रॅश बरे होतात.

धातूवृद्धी – दूधवेलीच्या काढ्याचे सेवननियमित केले असता धातूवृद्धी होते. अशाप्रकारे दूधवेली ही एक पौष्टिक पण उपयुक्‍त बहुगुणी वनौषधी आहे.( hoya pendula benefits in marathi )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.