पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील 11 हजार विद्यार्थ्यांचे दोन महिन्यांत नव्याने आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण केले आहे. करोना संकट काळातही अधिकारी, कर्मचाऱ्यांची ही कामगिरी उल्लेखनीय आहे.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा एकही विद्यार्थी आधार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी बाळगण्यात येणार आहे. शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप, शिष्यवृत्ती, विविध अनुदान, संच मान्यता आदी योजनांची कामे पारदर्शकपणे आणि बोगस पटसंख्या दाखवून लाभ घेण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आधार नोंदणी गरजेची आहे.
शाळास्तरावरून सरल प्रणालीत अद्यापही 67 लाख 21 हजार 824 विद्यार्थ्यांचा डेटा अपेडट केलेला नाही. या सर्वच विद्यार्थ्यांना आधार नोंदणी व अपडेशन योजनेला लाभ मिळणार आहे. या करिता 816 आधार संच उपलब्ध करून दिले आहे. यासाठी आधार ऑपरेटरची सेवा क्रीश इंट्राट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पुरवविण्यात येत आहे. या कंपनीबरोबर दोन वर्षांचा करारही केला आहे. डिसेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यातील दोन याप्रमाणे 72 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरू आहे.
सध्या 567 आधार ऑपरेटर कार्यरत असून 319 आधार संचाचा वापर सुरू आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, सहसंचालक दिनकर टेमकर, अधिक्षक सुरेश वाघमोडे यांनी आधार नोंदणीचे काम जलद होण्यासाठी अनेकदा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर वेगाने काम करण्यास वाव मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचा सरल प्रणालीवरील तपशील
विभाग – एकूण विद्यार्थी – आधार अपडेशेन असलेले विद्यार्थी – प्रलंबित विद्यार्थी
अमरावती – 21,64,696 – 15,80,458-5,84,238
औरंगाबाद – 27,04,848 – 17,02,443-10,02,405
कोल्हापूर – 20,68,081 – 16,14,168 – 4,53,913
लातूर – 15,75,964 – 11,40,596 – 4,35,368
मुंबई – 49,12,264-28,97,154-20,15,110
नागपूर – 20,93,675-15,64,755-5,28,920
नाशिक-30,48,676 – 25,44,699 – 5,03,977
पुणे – 37,91,835-25,93,942-11,97,893
एकूण- 2,23,60,039 – 1,56,38,215-67,21,824