नवी दिल्ली – दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारच्यावतीने चौदा एकर जागेवर लष्करी प्रशिक्षण देणारी एक निवासी शाळा उभारली जाणार आहे अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केली आहे. तेथे राहण्या जेवण्याच्या व्यवस्थेसह मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
शहीद भगतसिंग आर्म्ड फोर्सेस प्रिपरेटरी स्कूल असे या शाळेचे नाव आहे.झोरोडा कलान भागात ही शाळा उभारली जाणार आहे. तेथे शाळेची फी मोफत असेल आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे असतील.
केजरीवाल म्हणाले. दिल्लीत राहणारा कोणताही विद्यार्थी या शाळेत इयत्ता 9वी आणि 11वीसाठी प्रवेश घेऊ शकतो. दोन्ही वर्गांमध्ये प्रत्येकी 100 जागा असतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच ही सैनिकी शाळा सुरू होणार आहे अशी माहितीही केजरीवाल यांनी एका ट्विटर संदेशात दिली आहे.