World Cup 2023 Ind vs Aus Match :- भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा टीम इंडियाची रनमशीन म्हणून ओळखला. जातो. विराटने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. विराटने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात आणखी एक आगळावेगळा विक्रमाची नोंद केली आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात यजमान भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासाठी सामन्याची सुरुवात चांगली झाली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने स्फोटक फलंदाज मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्शलचा विराट कोहलीने अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे मार्शला खाते न उघडता तंबूत परतावे लागेल.
कोहलीने मोडला कुंबळेचा विक्रम…
विश्वचषकातील भारताच्या पहिल्याच सामन्यात पहिला झेल घेत कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा तो बिगर विकेटकीपर भारतीय क्षेत्ररक्षक बनला. कोहलीने या प्रकरणात माजी गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. माजी कर्णधार विराटने विश्वचषकातील 15वा झेल घेतला. याआधी कुंबळे सर्वाधिक झेल घेणारा बिगर विकेटकीपर क्षेत्ररक्षक होता. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Milestone Unlocked! 🔓
Virat Kohli now has most catches for India in ODI World Cups as a fielder 😎#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/HlLTDqo7iZ
— BCCI (@BCCI) October 8, 2023
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय …
विराट कोहली – 15*. अनिल कुंबळे – 14. कपिल देव – 12. सचिन तेंडुलकर 12.