न्यूयॉर्क – मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या शेअरचा भाव आज 1.31 टक्क्यांनी वाढून 404 डॉलर प्रति शेअर झाला. त्यामुळे या कंपनीचे बाजार मूल्य तीन लाख कोटी डॉलरच्या पुढे गेले आहे. अगोदरच अॅपल कंपनीचे बाजार तीन लाख कोटी डॉलर पेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे आता अमेरिकेत तीन लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त बाजार मूल्य असलेल्या दोन कंपन्या झाल्या आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात केलेल्या कामामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीचा महसूल आगामी काळात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार या कंपनीचे शेअर खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे.
या कंपनीचे चॅट जीपीटी नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी मोठी भांडवली गुंतवणूक केली असून ही आता 13 अब्ज डॉलरची झाली आहे. विषेश म्हणजे भारताचा शेअर बाजार जगात चौथ्या क्रमांकावर असून भारतातील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 3.3 लाख कोटी डॉलर आहे.