पुणे – ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी टीव्हीएस मोटर्सने वैशिष्ट्यपुर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या 225 सीसी क्षमतेचे लिक्वीह कुल्ड इंजिन असलेली टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस ऑटोरिक्षा बाजारात आणली आहे. हर रस्ते का हमसफर असलेल्या ऑटोरिक्षामध्ये नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
अधिक शक्तिशाली, नवतंत्रज्ञानयुक्त, वेगवान आणि आरामदायी अशी ही रिक्षा आहे अशी माहिती टीव्हीएस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे प्रमुख पुष्पक बरीक यांनी दिली. याप्रसंगी टीव्हीएस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक (विक्री) शिवानंद लामदाडे, विभागीय व्यवस्थापक सौरव घोराई, श्रीगणेश ऑटोचे राजूभाई दीक्षित, शाह आटोचे हरून शाह, सार्थक ऑटोचे सुनील बर्गे, रिदम ऑटोचे नीरज शाह, अनया ऑटोचे अजित भोईटे उपस्थित होते.
पुष्पक बरीक म्हणाले, टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लसमध्ये वाहनचालक आणि ग्राहकांसाठी उत्तम व्यवस्था, चांगले सस्पेन्शन आणि अधिक मायलेज देण्यात आले आहे. ही ऑटोरिक्षा सीएनजी, एलपीजी आणि पेट्रोल या तीनही प्रकारांत उपलब्ध आहे.
मागील 10 वर्षापासून कंपनीने 10 लाखापेक्षा जास्त तीनचाकी वाहनांची विक्री केली आहे. सध्या कंपनी भारतामधील 100 विविध शहरांमध्ये आणि जगभरातील 30 देशांमध्ये वाहनांचे सुटे भाग आणि आवश्यक सेवा पुरवित आहे, असेही बरीक यांनी नमूद केले.
श्रीगणेश ऑटो (स्वारगेट), शाह ऑटो (मंगळवार पेठ), अनया मोटो (मांजरी), रिदम ऑटो (हिंजेवाडी) आणि सार्थक ऑटो (चिंचवड) या अधिकृत डिलर्सकडे या रिक्षाची खरेदी करता येणार आहे. सोबतच ग्राहकांसाठी वाहन खरेदीकरिता आकर्षक कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. टीव्हीएस किंग का वादा या योजनेत दोन वर्षांची वारंटी, चार मोफत सर्व्हिसिंग, एक वर्ष मोफत रोडसाईड सहायता आणि 10 लाखाचा अपघाती विमा या सुविधा देण्यात येणार आहेत, असे शिवानंद लामदाडे यांनी सांगितले.