केरळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ एप्रिलला केरळला वॉटर मेट्रो भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी देशाला पहिली वॉटर मेट्रो सुपूर्द करणार आहेत. बऱ्याच कालावधीनंतर या मेट्रोला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. वॉटर मेट्रो रुळांवर नाही तर पाण्यावर धावणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी 23 वॉटर बोटी आणि 14 टर्मिनल असणार असून, त्यापैकी चार टर्मिनल पूर्णत: सुरू झाले आहेत. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियामध्ये प्रथमच वॉटर मेट्रो चालवली जात आहे.
ही सेवा सुरू झाल्याने शहरातील नागरिकांच्या वाहतुकीत सुसूत्रता येणार आहे. कोचीसारख्या शहरात वॉटर मेट्रो खूप उपयुक्त आहे. ही कमी किमतीची मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम असून प्रवास सुलभ होणार आहे. कोची आणि त्याच्या आसपासच्या 10 बेटांना जोडणारा हा केरळचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 एप्रिल रोजी येथे एका कार्यक्रमात कोची वॉटर मेट्रो (KWM) सेवेचा शुभारंभ करतील. विजयन यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, डाव्या लोकशाही आघाडी (LDF) सरकारने राज्यातील जनतेला दिलेले आणखी एक आश्वासन कोचीमध्ये 1,136.83 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या फ्लॅगशिप प्रकल्पाच्या सुरुवातीसह पूर्णत्वास येत आहे.’