मेस्सी सर्वकालीन महान फुटबॉलपटू – राहूल द्रविड

बार्सिलोना – भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडयाने नुकतीच बार्सिलोना विरुद्ध अटलाटिको माद्रीद दरम्यान झालेल्या सामन्याला हजेरी लावली असून यावेळी त्याने लीयोनाल मेसीची स्तुती करत मेस्सी हा सर्वकालीन महान फुटबॉलपटू असून त्याचा खेळ प्रत्येक्षात पाहणे म्हणजे पर्वणी आहे. यावेळी बार्सिलोना क्‍लबचे अध्यक्ष जेसेप बारबतेव यांनी बार्सिलोनाची जर्सी देऊन राहुल द्रविडला सन्मानीत केले. यानंतर मुलाखत देताना द्रविडने मेस्सी बद्दलचे मत मांडले.

यावेळी पुढे बोलताना द्रविड म्हणाला, माझ्या मते मेस्सी हा सर्वकालीन महान फुटबॉलपटू आहे. त्याच्याकडे वेळोवेळी गोल करण्याची असामान्य क्षमता आहे. त्याचप्रमाणे संघातील अन्य सहकाऱ्यांसाठी योग्य पास देत गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यातही त्याचा हातखंडा आहे. बॉल स्वताःकडे नसताना तो मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. अशा अनेक गोष्टीमुळे मला तो सर्वकालीन महान वाटतो.

बार्सिलोना येथील फुटबॉल सामन्याच्या वातावरणाविषयी बोलताना द्रविड म्हणाला, भारतामध्ये आयपीएल सामन्यांच्या वेळी जसे वातावरण असते तसे येथे वातावरण होते. ला लीग मधील महत्त्वाचे सर्व सामने भारतामध्ये पहिले जातात. विशेषतः बार्सिलोना विरूद्ध रियाल माद्रिद आणि बार्सिलोना विरूद्ध अटलेटिको माद्रिद या सामन्यांना विशेष प्रेक्षक वर्ग लाभलेला असतो.

तसेच भारतातील फुटबॉल संस्कृती विषयी बोलताना तो म्हणाला, भारतामध्ये इंडियन सुपर लीग म्हणून एक फुटबॉल स्पर्धा होत आहे. ज्या मुळे भारतात फुटबॉल वाढत आहे. परंतु, भारतात क्रिकेटच जास्त लोकप्रिय आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.