बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी उठून मेकअप करतात. कॅमेऱ्यांमध्ये आपल्या चेहेऱ्यावर चमक दिसावी म्हणून ते वॅक्स ट्रीटमेंट करतात आणि सजून धजून ते कॅमेऱ्याला सामोर जातात अशी टीका जेडीएस पक्षाचे नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी यानी केली आहे. ते म्हणाले की आम्ही सकाळी एकदा आंघोळ केली की बाहेर पडतो अगदी तोंड सुद्धा धुण्यास आम्हाला वेळ नसतो दुसऱ्या दिवशीच आम्ही तोंड धुतो. त्यामुळे आमचे चेहरे चकमकदार दिसत नाहीत. म्हणूनच आमच्या चेहेऱ्यांपेक्षा मोदींचा मेकअपने चमकलेला चेहरा टीव्हीवाल्यांना आवडत असावा म्हणूनच आमच्यापेक्षा ते मोदी दर्शन जास्त घडवत असावेत अशी शेरेबाजीही कुमारस्वामी यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडीयावर उलट-सुलट प्रतिक्रीयांचा पाऊसच पडला आहे.
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय