चिंबळी -शाळेतील सर्व वर्गांचे व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून ऑनलाइन पद्धतीने सोमवार (दि. 15) पासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिरसाठ, अलका ओव्हाळ यांनी दिली. मरकळ (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 मुलांची येथे 1 ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना 3399 पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केले होते. याप्रसंगी पदवीधर शिक्षक प्रवीण माटे, जानकी मुरकुट, वृषाली खरात, निलिमा माकोडे, निलिमा पंडित, नामदेव गायकवाड, वैशाली पालांडे, स्वाती तायडे, चैत्राली शिंदे, सुरेखा काळे व ज्येष्ठ शिक्षक विनोद चव्हाण उपस्थित होते.
दररोज सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना या ग्रुपद्वारे दैनंदिन अभ्यास व दिक्षा ऍपचा वापर याद्वारे सर्व मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. सर्व मुलांनी व पालकांनी ग्रुपवर दिलेल्या सुचनेनुसार सहकार्य करावे जेणे करून मुलांच्या अभ्यासत अडथळा येणार नाही, असे आवाहन शाळेच्या वतीने करणेत आले आहे.