गांधीनगर, पिंपरीतील घटना : परस्पर विरोधी गुन्हे दाखल
पिंपरी – गांधीनगर, पिंपरी येथे रविवारी (दि. 14) रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी दहा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
सतीश पांडुरंग भांडेकर (वय 40) यांनी सोमवारी (दि. 15) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय शिंगाडे (वय 30), विजय शिंगाडे (वय 32), दिनेश शिंगाडे (वय 27), चंद्रकांत शिंगाडे (वय 55, रा. खराळवाडी, पिंपरी) आणि चंद्रकांत जमादार (वय 35, रा. जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांचा भाऊ मुकेश भांडेकर (वय 30) यास लाथाबुक्क्या व चॉपरने मारून जखमी केले. तसेच त्याचे दोन दातही पाडले.
दिनेश विलास शिंगाडे (वय 29) यांनी याच्या परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी दत्ता भांडेकर (वय 35), सतीश भांडेकर (वय 30), मुकेश भांडेकर (वय 30), आशु भांडेकर (वय 19), अनिकेत भांडेकर (वय 25) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आरोपी सतीश, आशु आणि अनिकेत या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे घराबाहेर बसले होते. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी दत्ता भांडेकर याने चॉपरने फिर्यादी दिनेश यांच्यावर वार केले. आरोपी सतीश याने कोयत्याने वार केले. आरोपी मुकेश याने ब्लेडने गालावर वार केले. आरोपी आशु आणि अनिकेत यांनी लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी केले.