सहसा स्त्रीया ब्रेसियर वापरतात, त्या त्यांचे व्यक्तिमत्त्व उठावदार दिसण्यासाठी म्हणून. याशिवाय अन्य कारणेही असतीलच; पण आता आपल्याला हे पहायचे आहे की, स्त्रियांमध्ये लोकप्रिय असलेले हे अंडरगारमेंट आता पुरुषही वापरु लागले आहेत. अनेक ऍथलिट्स स्पोर्टस ब्रा वापरतात, हे तर सर्वज्ञात आहेच. मात्र, गायनेकोमास्टीया नावाच्या वेगळ्याच आजारात पुरुषांची छाती स्त्रियांप्रमाणे भरदार दिसू लागते. हे लपवण्यासाठी आता या आजाराने त्रस्त पुरुषही “ब्रा’ वापरु लागले आहेत.
स्त्रीयांच्या छातीवरील अंतर्वस्त्राला “ब्रेसियर’ नाव असले तरी पुरुषांसाठीच्या या वस्त्राला “मॅनसियर’ असे म्हणले जाते. याचाच अर्थ स्त्रिया त्यांचे व्यक्तिमत्त्व उठावदार दिसण्यासाठी “ब्रेसियर’ वापरत असतील, तर पुरुष असा अनैसगिक उठाव लपवण्यासाठी “मॅनसियर’ वापरतात. म्हणजेच या “ब्रा’ला कॉम्प्रेशन ब्रा म्हणतात. शिवाय याला कॉम्प्रेशन व्हेस्ट म्हणून देखील ओळखले जाते.
जे पुरुष ब्राझीयर घालणे निवडतात त्यांना दोन प्रकारात विभागले जाऊ शकते. एक म्हणजे अतिरिक्त आणि अनैसर्गिक स्थूूलपणामुळे पुढे आलेली छाती लपवणारे पुरुस आणि ऍथलेटिक्स किंवा धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारे खेळाडू त्यांची छाती कंडीशनमध्ये राहण्यासाठी “मॅनसिएअर’चा वापर करताना दिसतात. कधी कधी “मॅनसिएअर’चा वापर क्रॉस ड्रेसिंगचा भाग म्हणूनही केला जातो.
ड्रेस कोडींगची शिस्त म्हणून युरोप-अमेरिकेत पेटीकोट डिसिप्लीन असते. त्यानुसारही अनेकदा स्त्रियांना “ब्रेसियर’ आणि पुरुषांना “मॅनसियर’ सक्तीच्या असतात. जरी पुरुषांसाठी काही ब्रा विकसित केल्या गेल्या आहेत, परंतु बहुतेकदा ते फक्त त्यांच्या महिलांपेक्षा वरवरच्यापणे भिन्न असतात. पुरुषांना ब्रा घालण्याची कधीकधी वैद्यकीय आवश्यकता नसते. “द डोअरमन’ नावाच्या टीव्ही मालिकेमध्ये सीटकॉम सेनफिल्डच्या क्रॅमरने पुरुष ब्रा शोधून काढले होते, ज्याला त्यावेळी “मेन्सब्रा’ म्हणण्यात आले होते.