मुंबई – करोनाच्या लाटेमध्ये बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चनसह संपूर्ण कुटूंब बाधित झाले होते. करोनावर यशस्वीपणे मात करत बच्चन कुटुंबीय पुन्हा एकदा जोमाने कामावर परतले आहे. दरम्यान, करोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासमवेत लसीचा पहिला डोस घेतला आहे.
T 3861 –
Got it done !
My CoviD vaccination this afternoon ..
All well .. 🙏— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 1, 2021
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगद्वारे लसीकरणाची माहिती दिली. ते म्हणाले कि, लसीकरण झाले असून सर्व काही ठीक आहे. काल कुटुंब आणि सर्व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी झाली होती. त्याचा निकाल आज आला. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे लसीकरण करण्यात आले आहे. अभिषेक वगळता कुटुंबातील सर्व सदस्यांना लस देण्यात आली आहे. परंतु, अभिषेक बच्चन मुंबईच्या बाहेर असल्याने त्याला लस देण्यात आली नाही.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी करोनाची लस घेत आहेत. अभिनेता सैफ अली खान, सलमान खान, रोहित शेट्टी यांनी करोना लस घेतली आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या दोन्ही डोळ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रीयेत त्यांनी म्हटले आहे की, दुसरी शस्त्रक्रियाहीं चांगली झाली असून आता आमच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉ हिमांशु मेहता यांच्या कौशल्याबद्दलही त्यांनी कौतुगोदगार काढले आहेत. आता यापुर्वी जे पहायला मिळाले नव्हते तेही पहायला मिळेल असेही बच्चन यांनी या संदेशात नमूद केले आहे. पुर्वी आपल्याला दिसण्यात बराच प्रॉब्लेक यायचा पण आता दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर आपण रंग आणि आकार व्यवस्थीत ओळखू शकतो असेहीं बच्चन यांनी म्हटले आहे.