मंचर, (प्रतिनिधी) – आमृत महा आवास अभियान अंतर्गत राज्य पुरस्कृत शबरी घरकुल आवास योजना अंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून घरकूल बांधकाम केल्याबद्दल विभागीयस्तरावर प्रथम क्रमांक पारितोषिक विभायीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत कुशिरे बुद्रुक अंतर्गत मेघोली गावास पुणे येथे देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह अधिकारी उपस्थित होते .
आमृत महा आवास अभियान अंतर्गत राज्य पुरस्कृत शबरी घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून घरकुल बांधकाम केल्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत कुशिरे बुद्रुक मधील दरड प्रवण क्षेत्रातील मेघोली गावास प्रथम क्रमांक पुरस्कार वितरित करण्यात आला.
यावेळी प्रकल्प संचालक शालिनी कडु, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज ,ग्रामपंचायतीचे सरपंच भिमाबाई धादवड ,उपसरपंच गोविंदा आसवले, ग्रामसेवक मंगेश केंगले, जागा मालक अशोक शेंगाळे, डी. आर. डी. विस्तार अधिकारी सुनील भोईर, कनिष्ठ सहायक एकनाथ कोंढवळे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत कुशिरे बुद्रुकमधील मेघोली गाव हे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्तावित केले गेले आहे.