समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक

आंबेगाव तालुक्‍यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्र्यांची भेट

मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा समन्वय राखण्यासाठी पुणे येथील विधानभवनात तालुक्‍यातील भाजप पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे, अशी माहिती भाजपचे आंबेगाव तालुकाध्यक्ष संजय थोरात यांनी दिली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई येथील मंत्रालयात विविध मंत्र्यांची भेट घेतली.

यावेळी तालुक्‍यातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भीमाशंकर विकास आराखडा संदर्भात सविस्तर चर्चा केली. लवकरच भीमाशंकर परिसर विकास पाहणी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासकामांसंदर्भात संभाषणासाठी व्हॉट्‌सअप ग्रुप तयार केला असून याद्वारे जलद निर्णय घेण्यात येतील. तसेच पालकमंत्री पाटील यांनी तालुक्‍यातील विकासकामांचे उद्‌घाटन व कार्यकर्त्यांचा मेळावा लवकरच मंचर येथे घेणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, डॉक्‍टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, उपाध्यक्ष विजय पवार, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, सुशांत थोरात, नवनाथ थोरात, राजेंद्र काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)