पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजपाच्या पिंपरी विधानसभेतील सुपर वॉरियर आणि बुथ प्रमुखांची बैठक पार पडली. शहरातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्िथतीत ही बैठक पार पडली. यामध्ये आगामी निवडणूकीला सामोरे जाण्याबाबत घ्यायची खबरदारी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विधानसभानिहाय सुरू असलेले पक्षाचे काम याविषयी आढावा घेण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुजाता पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, जिल्हा सरचिटणीस संजय मंगोडेकर, शीतल शिंदे आदीसह सर्व सुपर वॉरियर्स, बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकून महाविजय मिळविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुपर वॉरियर आणि बुथ प्रमुखांची बैठक होत आहे. भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत आणून इतिहास घडविण्यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या वेळी केले.