पीएमपीच्या डेपो विकसनासाठी बैठक

पुणे – पीएमपीच्या डेपो विकसनासाठी लवकर महापालिका आणि पीएमपी प्रशासनाची संयुक्त बैठक होणार आहे. पीएमपीचे डेड किलोमीटर कमी करण्यासह, पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन बसच्या पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे तातडीने या जागा ताब्यात घेऊन या डेपोंची कामे सुरू करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

पीएमपीसाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात डेपो प्रस्तावित असून पीएमपीने या डेपोंसाठी काही ऍमेनिटी स्पेसची मागणी पालिकेकडे केली आहे. त्यात प्रामुख्याने जकात नाक्‍यांच्या जागांचा समावेश आहे. मात्र, त्यातील काहीच जागा पीएमपीच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तर निधीच्या कमतरतेमुळे काही ठिकाणीच डेपो विकसनाचे काम सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन नवीन येणाऱ्या बसेस तसेच डेड किलोमीटर कमी करण्यासाठी डेपोंची असलेली आवश्‍यकता या बाबी लक्षात घेऊन ही बैठक होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.